डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?

डेबिट कार्ड हल्ली प्रत्येकाकडे असतेच. शहर असो वा गाव अनेक ठिकाणी डेबिट कार्डाचा वापर सर्रास केला जातो. पण अजूनही अनेकांना डेबिट कार्डाबाबत शंका असतात. डेबिट कार्डाचेही अनेक प्रकार आहेत आणि त्याचा योग्य वापर कशा पद्धतीने करावा याचे ज्ञान सर्वांना नसते. आपण त्याची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. नुसते डेबिट कार्ड आहे म्हणून वापरायचे असे न करता त्याची इत्यंभूत माहिती तुम्ही घ्या. 

डेबिट कार्ड म्हणजे काय? 

What is Debit Card: अनेकांना डेबिट आणि क्रेडिट कार्डातील फरक अजूनही कळत नाही. पण प्रत्येकाला डेबिट कार्डाचे उपयोग माहीत असतीलच असं नाही. 

  • डेबिट कार्डाला पेमेंट कार्ड असंही म्हटलं जातं
  • डेबिट कार्डावर १६ अंकी संख्या असते ज्याला डेबिट कार्ड नंबर असं म्हणतात 
  • तसंच या डेबिट कार्डावर Expiry Date आणि कार्ड होल्डरचे नाव असते 
  • याशिवाय त्याच्या मागे CVV क्रमांक असतो आणि त्याखाली कार्ड होल्डरची स्वाक्षरी आवश्यक असते 
  • खाते असणाऱ्या बँकेतून डेबिट कार्ड प्रदान करण्यात येते 

वाचा – पॅन कार्ड ऑनलाईन बनविण्याची वापरा सोपी पद्धत

बचत खात्याशी जोडलेले असते डेबिट कार्ड 

डेबिट कार्ड हे सेव्हिंग अर्थात बचत खात्याशी जोडलेले आहे. कोणत्याही दुकानात अथवा मॉलमध्ये व्यवहार करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आपल्या देशात डेबिट कार्ड अत्यंत सोप्या पद्धतीने वापरू शकता. मात्र परदेशात याचा वापर करण्यासाठी इंटरनॅशनल डेबिट कार्डाची आवश्यकता भासते. 

काय आहे International Debit Card

आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड म्हणजे काय? इंटरनॅशनल डेबिट कार्डाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही विदेश दौऱ्यावर खर्च करू शकता. त्यासाठी तुम्हाला Hard Cash ची गरज भासणार नाही. परदेशात आपले रूपये वापरात येऊ शकत नाहीत त्यासाठी या कार्डाचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय डेबिड कार्डाचा वापर करताना Cash Back देखील मिळते. 

वाचा – वृद्धांना मिळणार ५ हजाराचे पेन्शन, कसा करावा अर्ज

डेबिट कार्डाचे प्रकार 

Master Debit Card – मास्टर डेबिट कार्डाचा उपयोग आपल्या देशात अधिक प्रमाणात होतो. हे अत्यंत प्रसिद्ध कार्ड असून अत्यंत सामान्य माणसांकडेही हे मास्टर कार्ड असू शकते. 

Visa Debit Card – हे कार्डदेखील प्रसिद्ध असून याचा उपयोग अनेक ऑनलाईन पेमेंट वा कामाकरिता होतो. या कार्डाच्या मदतीने राष्ट्रीय अथवा इंटरनॅशनल दोन्ही जागांवर ऑनलाईन माध्यमातून खरेदी करता येऊ शकते. 

Rupay Debit Card – रूपे कार्ड हे भारतीय मूळ कंपनीद्वारे लाँच करण्यात आलेले कार्ड आहे. NPCI अर्थात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे लाँच करण्यात आलेले हे कार्ड आहे. याच्या मदतीने विदेशी कंपनीच्या तुलनेत व्यवहार करताना कमी शुल्क द्यावे लागते. 

Maestro Debit Card – मेस्ट्रो डेबिट कार्डाला उस्ताद डेबिट कार्ड असेही म्हटले जाते. या डेबिट कार्डाच्या मदतीने तुम्ही भारताशिवाय अन्य देशांमध्येही ऑनलाईन व्यवहार करू शकता. 

Electric Debit Card – इलेक्ट्रिक डेबिट कार्ड अर्थात प्लॅटिनम कार्ड. याचा उपयोग डेबिट कार्डाचा अधिक उपयोग करणाऱ्या व्यक्तींंसाठी आहे. कारण पेमेंट देण्याघेण्याच्या अथवा रोख रक्कम काढण्याची याची मर्यादा अधिक असते. 

डेबिट कार्डाचा मुख्य उद्देश 

डेबिट कार्डाचा मुख्य उद्देश हा डिजीटल बँकिंग असून Net Banking, Online Shopping, Travelling, Booking, Easy Transaction आणि अन्य व्यवहार सोपा करणे हा आहे. यामुळे रोख रकमेसाठी अडून राहावे लागत नाही. 

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment