Sukanya Samriddhi Yojana करणार मालामाल, सरकारकडून मुलींना मिळणार 64 लाखांचे घर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली ,सुकन्या समृद्धी योजना ही अनेकांसाठी वरदान ठरलेली योजना आहे. या योजनेंतर्गत मुलींना आर्थिक सहाय्य मिळत आहे. पण आता याच योजनेचा एक भाग म्हणून सरकारकडून या योजनेंतर्गत 64 लाखांचे घर मिळणार आहे. मुलगी 10 वर्षांची झाल्यानंतर या योजनेसाठी एक खाते उघडण्यात येते. या खात्यात जमा होणाऱ्या पैशांवर योग्य दराने व्याज दिला जातो. ज्याचा उपयोग तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि त्यांना भविष्यात चांगले घर मिळवून देण्यासाठी होऊ शकतो. या योजनेंतर्गत इतकी रक्कम कशी जमा होईल याविषयी जाणून घेऊया.

Sukanya Samriddhi Yojana लाभ

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ कसा असणार आहे असा विचार करत असाल तर ही योजना तुम्हाला अधिक व्याज मिळून देण्यासाठी आहे. तुमच्या घरी जर मुलगी असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. या मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी ही योजना आहे. ज्याचे लाभ तुम्हाला दीर्घकालीन ठेवल्यानंतर मिळू शकणार आहे.

  1. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय किमान 10 वर्ष असायला हवे. तिच्या नावे तुम्ही बँकेचे खाते सुरु करावे.
  2. या योजनेची लॉक ईन अवधी ही 21 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे तुम्हाला त्यात जमा झालेली संपूर्ण रक्कम घेता येईल किंवा त्या आधीही याचा लाभ घेऊ शकता.
  3. सुकन्या समृद्धी योजनेसाठी महिना 500 रुपयांपासून सुरुवात करता येईल. वार्षिक दीड लाख इतकी मर्यादा आहे. त्यामुळे मुलींसाठी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार पैसे जमा करता येणार आहे.
  4. या योजनेत पैसा गुंतवल्यानंतर सरकार व्याजाचा उत्तम दर तुम्हाला देते. शिवाय तुम्हाला इन्कम टॅक्समध्येही फायदा मिळतो. व्याजाचा दर हा 7.6% इतका असून तो महागाईनुसार त्याचा दर वाढणार आहे.
  5. या योजनेमध्ये योग्य पैसे गुंतवल्यानंतर त्यातून इतका जास्त फायदा मिळू शकतो की त्यामुळे तुमच्या मुलीला घर घेणेही सोपे जाईल.

वाचा,

असे घेता येईल घर

sukanya samriddhi yojana

आता या योजनेंतर्गत तुम्ही घर कसं काय घेता येईल असा विचार करत असाल तर महागाईचा विचार करता पुढील काळात घर घेणे हे काही जणांसाठी स्वप्न राहणार आहे. पण या योजनेत जर तुम्ही पैसे मुलींच्या नावाखाली जमा करत असाल तर तुम्हाला घर घेणे शक्य होणार आहे.

उदा. दरमहा तुम्ही 12,500/- रुपये सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत पैसे जमा करत असाल तर 21 वर्षांपर्यंत तुम्हाला ही रक्कम 64,00,000/- लाख इतकी मिळणार आहे. याचा उपयोग तुम्ही मुलीसाठी घर घेण्याकरता करु शकता.

या योजनेंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये इतकी रक्कम जमा करता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेतील महत्वाचे मुद्दे

बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या रुपात सुरु झालेली कन्या समृद्धी योजना ही किती लाभदायक आहे हे आपण जाणून घेतेल. आता या योजनेतून तुम्हाला मिळकतीशिवाय इतर काय फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊया.

टॅक्स फायदा : जर तुमची कमाई टॅक्समध्ये येत असेल आणि तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत पैसे गुंतवत असाल तर टॅक्ससाठी फायदा मिळू शकतो.

व्याजाचा दर : सदर योजना ही सरकारी योजनेंतर्गत येत असल्यामुळे व्याजाचा दर हा चांगला मिळतो. २०२२-२३ या वर्षात 7.6% इतका व्याजदर मिळतो.

रिर्टन्स: सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कोणत्याही फसव्या अटी नाहीत. त्यामुळे इतर कोणत्याही योजनेसारखी इथे फसवणूक होत नाही. याचे रिर्टन्स हे 100% आहेत.

कंपाऊंडिग लाभ : सुकन्या समृद्धी योजना ही लाँग टर्म योजना असल्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त काळासाठी ठेवल्यानंतर मिळतो. जरी तुम्ही कमीत कमी रक्कम अकाऊंटमध्ये टाकत असाल तरी त्याचा लाभ चांगला मिळू शकतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नजीकच्या बँकेत जा आणि याची अधिक माहिती घ्या

योजनेसंदर्भात जाणून घेण्यासाठी

Leave a Comment