शेतकरी मित्रांसाठी आजचा विषय हा फारच महत्वाचा असणार आहे कारण आज आपण शेतकऱ्यांसाठी असलेल्या शेळी- मेंढी पालन अनुदान योजनेविषयी माहिती घेणार आहोत. शेतीसोबत जोडधंदा करु पाहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजना तशी नवी नाही. पण नव्या वर्षात ही योजनाही अपडेट झाली आहे. शेतकरी असून तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आज याची माहिती घेतल्यानंतर या योजनेचा लाभ अवश्य घ्या.
शेळी-मेंढी पालन अनुदान योजना
महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 2022 साली Sheli Mendhi Palan Anudan Yojana योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून जोडधंद्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तब्बल 30 मेंढी- शेळ्या सोबत शेड असा 100% अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र राज्याने सुरु केलेली ही योजना शेतकऱ्यांना चांगलीच फायद्याची ठरत आहे. ज्यांना शेळी-मेंढी पालनात रस असेल अशा व्यक्ती यासाठी अर्ज करु शकतात. किमान 10 आणि जास्तीत जास्त 30 शेळया- मेंढ्या प्रत्येक इच्छुक अर्जदाराला दिल्या जातील.
आजही राज्यातील अनेक ग्रामीण भागात शेतीसोबतचा जोडधंदा म्हणून पशुपालन केले जाते. यामध्ये कुक्कुटपालन, मेंढीपालन, शेळीपालन या गोष्टी येतात. गरीब शेतकऱ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना आहे. ज्या शेतकऱ्यांना हा जोडधंदा करताना जर शेड बांधणे शक्य नसेल तर राज्य सरकारकडून ही आर्थिक मदत केली जाते.
योजनेचे नाव | शेळी- मेंढी पालन अनुदान योजना |
लाभ | ३० पर्यंत शेळ्या- मेंढ्या, शेडसाठी अनुदान |
विशेष फायदा | अनुसूचित जाती आणि जमातींना अधिक लाभ |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
शेळी पालन शेड योजना
शेळी पालन करताना शेड ही देखील तितकीच महत्वाची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त 47 लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते. 10 शेळ्यांसाठी साधारणपणे 49,000/- इतके अनुदान दिले जाते. हा खर्च कुशल खर्च आणि अकुशल खर्च असा विभागून दिला जातो. ज्यावेळी तुम्ही याचा अर्ज करता त्यावेळी याची योग्य आणि लेटेस्ट अशी माहिती तुम्हाला मिळते.
इतर काही महत्वाच्या योजना व माहिती,
मोफत शिलाई मशीन योजना : सरकार देत आहे सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन , असा करा अर्ज
रेशन कार्डचे फायदे: रेशन धान्याऐवजी 9000 हजार मिळणार फक्त हा फॉर्म भरा
Online Marriage Certificate | आता घरबसल्या करा विवाह नोंदणी
शेळी मेंढी पालन योजना Form डाऊनलोड
शेळी-मेंढी पालन योजना काय आहे ते जाणून घेतल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील गोष्टी नक्की फॉलो करा.
- शेळी-मेंढी पालन योजनेसाठी https://www.mahabms.com/ संकेतस्थळावर जा.
- तेथील योजनेच्या टॅबमध्ये तुम्हाला शेळी मेंढीपालन योजना दिसेल.
- तेथूनच तुम्हाला अर्ज मिळेल. तो अर्ज डाऊनलोड करुन भरुन तो ऑनलाईनच भरायचा आहे.
- सदर संकेतस्थळावर अन्य योजना आहेत त्यांचीही माहिती यातून मिळू शकेल
योजनेचे निकष
शेळी- मेंढी पालन अनुदान योजनेचा लाभ घेण्याचा विचार असेल तुम्ही त्या निकषांमध्ये बसता की, नाही हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नेमके कोणते निकष आहेत ते आता पाहुयात
- दारिद्र्य रेषेखाली असलेल्यांना लाभ
- अत्यल्पभूधारक ( ज्यांची जागा एक हेक्टर इतकी आहे)
- अल्पभूधारक (किमान 1 ते 2 हेक्टर जागा)
- महिला बचत गटातील लाभार्थी
- सुशिक्षित बेरोजगार रोजगार स्वंयकेंद्रात नोंद असलेला बेरोजगार युवक
योजनेची अंमलबजावणी
योजनेसाठी लागणाऱ्या निकषात जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करु शकता. पण त्याची अंमलबजावणी नेमकी कशी असणार आहे हे जाणून घेऊया.
- १. सदर योजनेमध्ये पात्र लाभर्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांचे कोअर बुकिंगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडणे गरजेचे असते. अनुदानाची रक्कम मंजूर झाल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.
- लाभार्थ्यांना आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य असते.
- लाभार्थ्यांना जरी अनुदान मिळणार असले तरी देखील त्यांना स्वत:चा हिस्सा जमा करणेही तितकेच गरजेचे असते.
- शेळी आणि मेंढीपालन योजनेसाठी ज्या मेंढ्या देण्यात येतील त्या मेंढ्या स्थानिक असतील. जर नर मेंढे उपलब्ध नसतील तर अशावेळी ते बाजारातून घेतले जातील.
पीएम किसान योजना 14व्या हप्तासाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक जारी : जाणून घ्या कोणत्या दिवशी येतील ₹ 2000
योजनेत वाटल्या जाणाऱ्या शेळी मेंढीचा विमा
शेळी-मेंढीचा विमा हा देखील काढला जाणार आहे. या विम्याचे स्वरुप नेमके कसे असणार आहे
- शेळी मेंढी खरेदी केल्यावर त्यांचा विमा लगेच काढणे बंधनकारक असणार आहे.
- 50% ही रक्कम लाभार्थ्यांना भरावी लागणार आहे.
- गटातील विमा हा संरक्षित शेळ्या, मेंढ्या किंवा नर बोकड यांचा मृत्यू झाल्यास प्राप्त होणाऱ्या विम्यातून लाभार्थ्यांना पुन्हा शेळी-मेंढी खरेदी करणे बंधनकारक असणार आहे.
जर तुम्हाला शेळी-मेंढी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच याची माहिती इतरांपर्यंत पोहाचवायला हवी.