SBI बँकेत खाते असेल तर नक्की वाचा, पैसे काढताना…

जर तुमचे SBI बँकेत खाते असेल तर हा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा असा असणार आहे. कारण आता बँकेतून कॅश काढतानाचे नियम बदलण्यात आलेले आहेत. आता पैसे काढताना तुम्हाला काही गोष्टींची खातरजमा करावी लागणार आहे. एटीएममधून पैसै काढताना हा बदल तुम्हाला जाणवणार आहे. नेमके कोणते बदल होणार आहेत. यासंदर्भातील विस्तृत माहिती

आता पैसे काढताना…

बँकेतील पैसे काढण्यासाठी अनेक जण एटीएमचा वापर करतात. त्यामुळे बँकेत जाण्याची फेरी वाचते. पण याच एटीएममधून अनेक स्कॅम देखील होताना समोर आले आहेत. त्यामुळेच बँक सुरक्षा वाढवण्यासाठी खूप काळजी घेताना दिसते. त्यामुळेच तुम्ही जर आता पैसे काढण्यासाठी ATM मध्ये गेलात तर तुम्हाला पैसे काढताना तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी (OTP) येईल तो टाकल्यानंतरच एटीएमधून पैसे काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे जरी तुमची पैसे काढण्याची प्रक्रिया सहज सोपी आणि पटकन होणारी अशी वाटत असली तरी आता सुरक्षेच्या कारणामुळे तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे.

अधिक वाचा

रिटायर्ड कर्मचाऱ्याला मिळू शकते जास्त पेंशन, जाणून घ्या कसे
शेतकऱ्यांना मिळणार ८०% अनुदान, आता बोअरवेल बसवणे होईल सोपे
ATM कार्ड असेल तर सरकार देणार 5 लाख रुपय, जाणून घ्या कसे
१० मिनिटांत मिळवा ७ लाखाचे लोन, कुठून आणि कसे ते घ्या जाणून

योजनेचा घ्यावा लाभ

खरंतर SBI कडून ही सुविधा 2020 सालापासून सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती देखील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. पण असे असतानाही खूप जणांनी याचा लाभ घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच या सेवेचा लाभ घेण्यासाठी बँक सतत अपील करताना दिसत आहे. तुमच्या मेहनतीचा पैसा हा कोणत्याही स्कॅममधून जाऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही यासाठी आताच अर्ज करायला हवा.

ओटीपीने करा व्यवहार

एटीएममधून पैसै काढण्यासाठी गेलात आणि तुम्हाला 10,000 हून अधिक रक्कम काढायची असेल तर अशावेळी तुमच्या फोनवर हा ओटीपी येईल. तो बरोबर ओटीपी टाकल्यानंतरच मग तुम्हाला पैसे काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे पैसे काढायला जात असाल तर तुमच्यासोबत तुमचा मोबाईल असणेही तितकेच गरजेचे आहे.

फसवणूकीपासून वाचायचे असेल तर आजच तुमच्या बँकमध्ये जाऊन या सुविधेचा लाभ घ्या.

Leave a Comment