Relief Packege For Farmers: अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत

अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. अनेक राज्यात सोसाट्याचा वारा, वादळ, पाऊस इतका झाला आहे की, त्याचा फटका शेतीला झालेला दिसत आहे. शेतीचे न भरुन काढता येणारे नुकसान हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. अवकाळी पावसाच्या फटक्यातून सावरण्यासाठीच सरकारकडून Relief Packege For Farmers ची घोषणा करण्यात आलेली आहे. सांगण्यास आनंद होतो की, आतापर्यंत करण्यात आलेल्या मदतीपेक्षा ही मदत जास्त आहे. ही योजना काय आहे आणि याचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येणार आहे याची माहिती घेऊया.

सरकारनं केलाय सर्व्हे

तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा लेख फार महत्वाचा आहे. कारण सध्या अनेक राज्यांमध्ये बराच पाऊस पडला. खूप जणांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हेच नुकसान लक्षात घेऊन सरकारने एक सर्व्हे केला आहे ज्यामध्ये काही राज्यांच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असे दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने राजकोट, जुनानगर, अहमदाबाद, पाटन, सूरत, कच्छ, भावनगर, जामनगर, अमरेली अशा काही राज्यांचा समावेश आहे. ज्यांना या Relief Packege For Farmers चा लाभ मिळणार आहे.

शेतीचे नुकसान मिळणार भरुन

शेतीचे जे काही नुकसान झाले आहे ते काही अंशी भरुन मिळणार आहे. या साठी काही निकष असतील जर त्या निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर मदतीची रक्कम ही जास्तीत जास्त ३०,०००/- आणि कमीत कमी ४,०००/- इतकी असणार आहे. तुमच्या एकूण शेतीच्या 33 टक्के नुकसान हे भरण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे. यामध्ये पिकांचा विचार केला तर त्याची वर्गवारी करुन मगच त्याचा फायदा मिळणे शक्य होणार आहे. जसे की, गहू, चणे, पपई, आंबा, डाळी, लिंबू अशा काही पिकांचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही ही पीक घेत असाल तर तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो.

ही माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर करायला अजिबात विसरु नका.

अधिक वाचा

Leave a Comment