शौचालय ही प्रत्येकाची अगदी प्राथमिक गरज आहे. शहरात ठिकठिकाणी शौचालय असल्यामुळे त्यांची कमतरता भासत नाही. पण आजही अनेक गावांमध्ये शौचालये नाहीत. त्यामुळे अजूनही अनेक ठिकाणी लोकं बाहेरचं जातात. शौचालयाचे महत्व जाणून प्रत्येक घरी शौचालय असावे यासाठी सरकारने ‘हर घर शौचालय’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांची मदत करणार आहे. या योजनेची सुरुवात 2014 सालापासून करण्यात आली. वेगवेगळ्या स्तरातून याची जनजागृतीही करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय याचा अर्ज कसा करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
हर घर शौचालय
प्रधानमंत्री ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली असून कोणीही शौचालयासाठी बाहेर न जाता आपल्याच घरी शौचालय बांधावे हे यामागील उद्दिष्ट आहे. आजही अनेक ग्रामीण भागात महिला- स्त्री- बालकं ही उघड्यावर शौचाला जातात त्यामुळे जागोजागी घाण होते. त्यामुळेच लोकांना जागरुक करण्यासाठी प्रधानमंत्री योजनेंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यांच्या खात्यात 12००० हजार रुपये टाकले जातील. ज्याचा उपयोग त्यांना शौचालय बांधण्यासाठी करण्यात येणार आहे.
योजनेचे नाव | हर घर शौचालय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन |
लाभार्थी | गरीबांना शौचालय निर्मितीसाठी मदत |
उद्देश्य | स्वच्छ भारतची निर्मिती |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अनुदान राशी | 12000/- |
पात्रता
शौचालयाच्या बांधणीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. या योजनेसाठी तुमची पात्रता देखील पाहण्यात येणार आहे. पात्रता तपासल्यानंतर मगच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी कोणती पात्रता लागू पडते ते पाहुया.
- शौचालय योजनेसाठी अनुदान मिळवायचे असेल तर तुमच्या घरी आधीपासून शौचालय नको.
- दारिद्र्य रेेषेखाली असलेल्या लोकांनाच याचा लाभ मिळू शकतो.
- या योजनेसाठी लागणारी सगळी कागदपत्रे तुमच्याकडे असायला हवीत.
शौचालय योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
शौचालय योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे काही महत्वपूर्ण कागदपत्रे असायला हवीत. ही कागदपत्रे असल्यास तुम्हाला अनुदान मिळणे सोपे जाईल.
- आधार कार्ड
- बॅंक पासबुक
- ओळखपत्र
- मोबाईल क्रमांक
- इमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
ऑनलाईन अर्ज

योजना, पात्रता आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची माहिती घेतल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://swachhbharatmission.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. या वेबसाईटच्या citizen corner मध्ये तुम्हाला application for IHHL दिसेल. तेथे क्लिक करुन मग तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. लॉग ईन केल्यानंतर आणि सगळी माहिती भऱल्यानंतर तुमचे अकाऊंट बनेल. अकाऊंट बनल्यानंतर मग तुम्हाला New Application वर क्लिक करुन मग समोर येणारा सगळा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. सगळा फॉर्म भरल्यानंतर Apply करुन तुम्ही या योजनेचा रिप्लाय येण्यासाठी वाट पाहायची आहे.
पोस्ट ऑफिस चे नवीन व्याज दर: जाणून घ्या, कोणत्या योजनेसाठी किती टक्के व्याज वाढले?
उपयुक्त योजना
- ज्येष्ठ नागरिक बचत योजना काय आहे? तुम्ही याचा असा लाभ घेऊ शकतात
- सुकन्या समृद्धी योजनेत 1000, 2000, 3000, 5000 किंवा 10000 जमा केल्यास किती पैसे मिळतात? जाणून घ्या
- या 4 प्रकारे घरबसल्या तुम्ही तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता
- मोबाईलवरून PF खात्यातील पैसे १ तासात काढणे झाले सोप्पे, पूर्ण प्रोसेस समजून घ्या,
- पॅन कार्ड कर्ज योजना: पॅन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, मिळेल ₹ 50 हजार कर्ज
- 50 हजारापासून 10 लाखापर्यंत मिळेल मुद्रा लोन, कसा कराल ऑनलाईन अर्ज