प्रधानमंत्री आवास योजनेसाठी असा करा अर्ज, मिळवा मोफत घर

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. त्यातील निवारा अर्थात घर घेणे किंवा बांधणे सगळ्यांच्याच खिशाला परवडते असे नाही. अशांसाठी त्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. या योजनेचा लाभ घेताना अनेकांना 1,20,000 चे घर बांधून देण्यात आले आहे. या योजनेतून गरीबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणे उद्दिष्ट्य आहे.

प्रधानमंत्री आवास योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली प्रधानमंत्री आवास योजना ही प्रत्येक गरीबाला त्याचे हक्काचे घर मिळवून देणारी अशी योजना आहे. या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबाला होणार आहे. ज्यांच्याकडे त्यांच्या हक्काचे घर नाही अशांना या योजनेतून सरकारकडून घर बांधून दिले जाणार आहे. गरीबांच्या डोक्यावर छत असावे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेतून ज्यांचे घर हे पक्के नसेल तर अशांना पक्के घर बांधून दिले जाणार आहे.

आता पर्यंत अनेकांना या योजनेतून घर बांधून मिळाली आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचा अर्ज करणे गरजेचे असते. तो अर्ज केल्यानंतर ज्यांची निवड या योजनेसाठी होते. त्यांना घर बांधण्यासाठीची रक्कम थोडी थोडी करुन दिली जाते. ही आर्थिक सहाय्य देणाी अशी योजना असल्यामुळे या योजनेसाठी तुम्ही पात्र असणेही तितकेच गरजेचे असते.

PMAY योजना पात्रता

प्रधानमंत्री आवास योजना काय आहे ते कळल्यानंतर जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेण्याचा विचार असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र असणे गरजेचे आहे. या योजनेसाठीचे निकष पुढील प्रमाणे

  • प्रधानमंत्री आवास योजना ही एकाच घरातील पती-पत्नी, मुली, मुलं यांना घेता येऊ शकते.
  • प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याआधी तुमच्याकडे पक्के घर नको. जर तुमची झोपडी असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकेल.
  • जर तुम्ही 18 वर्षांच्या वर असाल तर तुम्ही तुमचा वेगळा अर्ज नक्कीच करु शकता.
  • आवास योजनेसाठी वार्षिक मिळकत ही मध्यम गटासाठी ६-१२ लाख, 3-6 लाख आणि 3 लाख इतकी असली पाहिजे. (त्यानुसार लाभाची रक्कम ही कमी जास्त होते)

अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी क्लिक करा

असा करा अर्ज

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करणे गरजेचे आहे. ती पहिली पायरी पूर्ण केल्यानंतर मगच तुम्हाला एक फॉर्म भरण्यासाठी येईल. हा सगळा फॉर्म भरुन झाल्यानंतर मग तुम्हाला यात सगळी माहिती भरायची आहे. फॉर्म भरल्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची एक यादी वेबसाईटवर टाकली जाते. त्यानंतरच तुम्हाला याचा लाभ मिळतो.

अधिक वाचा

ST महामंडळात मोठी भरती, तब्बल १,५०,००० लाख मिळेल पगार

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन


Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment