Pashu Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांना सरकारडून दिले जाणार क्रेडिट कार्ड

शेतकऱ्याला विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार कायम तत्पर असते. शेती आणि जोडधंद्याला चालना मिळावी यासाठी सरकारतर्फे Pashu Kisan Credit Card Scheme ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. जे शेतकरी पशुपालनाचा जोडधंदा करतात त्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. या योजनेतून तब्बल 1,50,000 इतकी रक्कम सरकार मदत म्हणून देणार आहे. दरम्यान ही योजना नेमकी आहे तरी काय आणि त्याचा लाभ करा घेता येईल याविषयीची अधिक माहिती या लेखातून घेणार आहोत. त्यामुळे हा संपूर्ण लेख वाचायला अजिबात विसरु नका.

Pashu Kisan Credit Card Scheme

शेती किंवा शेतीला पुरक असा धंदा करु इच्छित असाल पण तुमच्याकडे जागा कमी असेल तर अशावेळी खूप जण पशुपालनाचा धंदा करतात. अशाच शेतकऱ्यांसाठी आहे Pashu Kisan Credit Card Scheme पशु किसान क्रेडिट कार्ड स्किम. या क्रेडिट कार्ड स्किमच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जर पशुपालन जसे की, गाय, म्हैस, बकरी अशा पशुंचे पालन करायचे असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये गायींचे पालन करत असाल तर 40,000/- ,म्हशी पालनासाठी 60,000/- इतकी मदत मिळणार आहे. तर त्यांचे पालन करण्यासाठी शेतकऱ्याला तब्बल १,६०,०००/- पर्यंतची मदत केली जाणार आहे.

योजनेचे नावपशु किसान क्रेडिट कार्ड योजना
योजना केंद्र सरकार
लाभार्थी देशातील सगळ्या पशुपालक शेतकऱ्यांसाठी
लाभपशुपालकांना ऑफलाईन पद्धतीने क्रेडिट अर्थात पैसे पुरवणे
उद्देश्यपशुपालकांना पशुपालनासाठी चालना देणे

पशु किसान योजनेचा लाभ

पशु किसान योजनेचा लाभ नेमका कसा मिळणार आहे असा विचार करत असाल तर हे महत्वाचे मुद्दे तुम्ही नक्की जाणून घ्यायला हवे.

  • जर शेतकरी गायी पाळण्याचा विचार करत असतील तर यासाठी त्यांना 40000/- इतके लोन दिले जाईल.
  • शेतकरी म्हशी पाळू इच्छित असाल तर तुम्हाला त्यासाठी ६०,०००/- इतके लोन दिले जाईल.
  • बकरी पालनासाठी 4000/- रुपये
  • डुक्कर पालनासाठी 16300/- इतकी मदत वार्षिक केली जाईल

पशु क्रेडिट कसे काम करते?

पशु क्रेडिट कार्ड योजना नेमकी कशी काम करते हा विचार असाल तर हे क्रेडिट कार्ड इतर कोणत्याही क्रेडिट कार्डप्रमाणेच काम करते. हे क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरामध्ये मिळते. क्रेडिट कार्ड प्रमाणेच तुम्हाला व्याजाने पैसे मिळतात जे व्याज तुम्हाला EMI प्रमाणेच भरायचे असते. जर एखादा हफ्ता भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला तो पुढील महिन्यात भरण्याची मुभा दिली जाते. ( इतर बँकाप्रमाणे तुमचा CIBIL) त्यामुळे खराब होत नाही.

ज्यावेळी तुम्हाला हे क्रेडिट कार्ड मिळते. त्यानंतर त्याचा वापर तुम्हाला पशू खरेदी, देखभालसाठी दिला जातो. तुम्हाला दिलेले व्याज वर्षभरात देणे बंधनकारक असते.

वाचा,

असा करा अर्ज

पशुपालनाचा विचार करत असाल तर आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आजच अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे लागतील.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड / वोटर आयडी
  • बँकेचे कागदपत्रे

कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ती घेऊन राष्ट्रीयकृत बँकेत जायचे आहे. तिथे या योजनेचा फॉर्म घेऊन तो भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या पशुचे पालन करु इच्छिता त्यानुसार तुम्हाला लोन मिळण्यास मदत करण्यात येईल.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायच असेल तर तुम्ही आजच तुमच्या जवळील बँकेत जा आणि याचा लाभ घ्या.

Leave a Comment