रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई

देशातील नागरिकांचा विकास करणे आणि गरिबांचे कल्याण करणे यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असतात. मात्र अनेक लोक याचा गैरफायदा घेताना दिसतात. पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही रेशन कार्डावर मोफत रेशन लुटण्याचे काम अनेक जण आतापर्यंत करत आले आहेत. त्यामुळे खरंच गरीब आहेत, ते मात्र वंचित राहतात. यासाठी आता सरकारने कठोर पावलं उचलली असून नवे नियम आणि निकष लागू केले आहेत, जेणेकरून वंचित आणि गरजू व्यक्तींनाच रेशन मिळू शकेल. 

डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?

जाणून घ्या नवे निकष

कोणत्या व्यक्तींना घेता येणार नाही लाभ हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तींकडे खाली नमूद केलेल्या गोष्टी असतील त्यांनी तहसील कार्यालयात आपले रेशन कार्ड जमा करायचे आहे – 

  • स्वतःच्या कमाईमधून १०० चौरस मीटर्सचा फ्लॅट/दुकान/प्लॉट घेतला असल्यास
  • चार चाकी गाडी वा ट्रॅक्टर 
  • शस्त्राचा परवाना असल्यास
  • गावात कुटुंबाची वार्षिक मिळकत २ लाख अथवा शहरात मिळकत ३ लाख असल्यास

सरकारकडे जमा करावे

सरकारकडे वरील मुद्दे असणाऱ्या व्यक्तींनी स्वतः रेशन कार्ड जमा करणे आवश्यक आहे. रेशनकार्ड स्वतः जमा  न केल्यास, पडताळणीनंतर आढळल्यास रद्द करण्यात येतील. अशा व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

वाचा – LIC Aadhar Shila Policy: गुंतवा रोज ५८ रूपये आणि मिळवा तब्बल ८ लाख

कोणती कारवाई होऊ शकेल?

नव्या रेशन कार्डाच्या नियमानुसार कार्ड जमा न केल्यास, तपासणीनंतर ते रद्द करण्यात येईल. तसंच सदर कुटुंबावर कायदेशीर कारवाईदेखील होईल. याशिवाय सदर कुटुंंबाने आतापर्यंत घेतलेल्या सर्व रेशनची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल. तुम्हाला यासाठी एक फॉर्म भरून रेशन कार्ड रद्द करता येईल. 

रेशन कार्ड रद्द करण्यासाठी फॉर्म क्लिक करा 

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment