Majhi Bhagyashree Kanya Yojana : आजही अनेक ठिकाणी मुलींचा जन्म हा कुटुंबासाठी आनंदाची बातमी नसते. पण ज्यांच्या घरी कन्यालाभ होईल त्यांना सरकारकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
ज्यांच्या घरी कन्यालाभ होईल अशांना सरकारकडून चक्क 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. माझी भाग्यश्री कन्या योजना या अंतर्गत हा आर्थिक लाभ होणार असून ही योजना नेमकी काय? त्याचा लाभ कोणाला? आणि कसा घेता येईल याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
ज्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे अशांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची असणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण लेख वाचायला अजिबात विसरु नका.
Majhi Bhagyashree Kanya Yojana
माझी भाग्यश्री कन्या योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत ज्या पालकांना मुलगी आहे त्यांना या योजनेतून तब्बल 50,000 रुपये मिळतात. ही योजना त्यांच्यांसाठीच आहे जे मुलींच्या जन्मानंतर नसबंदी करतात.
एक किंवा दोन मुली असतील तरी देखील या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेतून मिळणारे पैसे हे थेट मुलींच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. पण मुलगी झाल्याच्या वर्षाच्या आतच नसबंदी करणे अनिवार्य असते.
( पहिल्या मुलीनंतर एक वर्षाच्या आत आणि दुसऱ्या मुलीनंतर 6 महिन्याच्या आत नसबंदी करणे आवश्यक असते. ) शिवाय जर पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या मुलीनंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींना 25,000- 25,000 अशी रक्कम समान वाटणी करुन दिली जाते.
अधिक वाचा : पीएम किसान योजना 14व्या हप्तासाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक जारी : जाणून घ्या कोणत्या दिवशी येतील ₹ 2000
माझी भाग्यश्री कन्या योजना ठळक मुद्दे
योजनेचे नाव | महाराष्ट्र राज्य माझी भाग्यश्री कन्या योजना (2016) |
योजना कोणासाठी | एकुलती एक मुलगी किंवा दोन मुलीनंतर नसबंदी केल्यास |
योजनेचा लाभ | 50,00/- रुपये |
कसा घ्याल लाभ | https://www.maharashtra.gov.in |
माझी भाग्यश्री कन्या योजनेचे लाभ
माझी भाग्यश्री कन्या योजनेचे लाभ तुम्हाला थोडक्यात कळले असतील पण याचे लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. त्या पुढीलप्रमाणे
- जर खास मुलींसाठी तुमचे फॅमिली प्लॅनिंग असेल. म्हणजे एक मुलगी झाल्यानंतर तुम्ही नसबंदी करत असाल किंवा दोन मुली झाल्यानंतर तुम्ही नसबंदी करत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
- माझी भाग्यश्री कन्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला https://www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे.
- जर तुमची वार्षिक कमाई 7.5 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येऊ शकतो. अन्यथा या योजनेच्या गटात तुम्ही बसणार नाही.
- हा अर्ज केल्यानंतर आणि सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्ही या योजनेचे लाभार्थी होऊ शकता.
- मुलींच्या नावावर पैसे बँकेत डिपॉझिट करताना आईच्या नावावर बँकेचे खाते सुरु केले जाते. ही रक्कम जमा झाल्यानंतर लगेच काढता येत नाही. मुली 6 वर्षांच्या झाल्यानंतर त्यातील काही व्याजाची रक्कम दिली जाते. त्यानंतर 1२ व्या वर्षी व्याजाची रक्कम दिली जाते. संपूर्ण 50,000/- हे मुलीने 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर दिले जातात.
- मुलींच्या विकासासाठी ही रक्कम दिली जाते. त्यामुळे त्यांचे शिक्षण ही पाहिले जाते. त्यासाठी मुलीने किमान दहावी पास असणे गरजेचे आहे. ती अविवाहित असायला हवी
अधिक वाचा : Online Marriage Certificate | आता घरबसल्या करा विवाह नोंदणी
Majhi Bhagyashree Kanya Yojna कागदपत्रे
वरील सर्व गोष्टींमध्ये फिट बसत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता. त्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करा.
- अर्जदार भारताचा नागरिक असावा
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आईच्या अकाऊंटची माहिती
- निवासाचा दाखला
- कमाईचे प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
असा करा अर्ज

जर वरील सगळ्या गोष्टींची पूर्तता तुम्ही करु शकत असाल किंवा या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही संकेतस्थळावर जाऊन याची माहिती घेऊ शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. यात तुम्हाला या योजनेची अधिक माहिती मिळेल. या शिवाय तेथेच तुम्हाला त्याचा अर्ज मिळेल. कागदपत्रांची पूर्तता करुन या योजनेचा लाभ घ्या.
वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा
जाणून घ्या सरकारच्या आणखी काही योजनांविषयी
या दिवशी येतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येतील – नवीन यादी जाहीर
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Whatsapp ग्रुप मध्ये सहभागी व्हा