LIC Aadhar Shila Policy: गुंतवा रोज ५८ रूपये आणि मिळवा तब्बल ८ लाख

भारतीय जीवन विमा निगम (LIC) हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण बरेचदा महिला पॉलिसीमध्ये खूपच कमी पैसे गुंतवताना दिसतात. त्यामुळे एलआयसीने महिलांसाठी खास पॉलिसी बनवली आहे. या पॉलिसीचे नाव एलआयसी आधार शिला पॉलिसी असे असून वयाच्या ८ व्या वर्षीपासून ते ५५ व्या वर्षापर्यंत महिला पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. LIC Aadhar Shila Policy मुळे नेमके काय लाभ होतात जाणून घ्या. 

कशी आहे गुंतवणूक?

या पॉलिसी अंतर्गत महिला कमीत कमी ७५ हजार रूपये तर अधिकाधिक ३ लाखाची गुंतवणूक करू शकतात. तिमाही, सहामाही आणि वर्षाच्या आधारावर या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता येते. या पॉलिसीचे कमीत कमी १० वर्ष आणि अधिकाधिक २० वर्ष अशी तुम्हाला रक्कम भरावी लागेल. 

वाचा – डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?

आधार शिला पॉलिसी नेमकी काय?

LIC कडून निम्नस्तरीय आणि मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी ही पॉलिसी करण्यात आली आहे. यामध्ये कमीत कमी ७५ हजार रूपये अधिकतम रक्कम ३ लाख आहे. यामध्ये तुम्ही प्रतिदिवशी ५८ रूपयांची बचत करू शकता. तसंच ही दीर्घकालीन पॉलिसी असून याचा परतावा उत्तम मिळतो. या पॉलिसीची Maturity झाल्यानंतर तुम्हाला मूळ राशी आणि व्याज दोन्ही एकत्र देण्यात येते. या पॉलिसीत पैसे गुंतवल्यावर डेथ कव्हर वर्षाला प्रिमियम ७ पटीने आणि बेसिक कव्हरवर ११० टक्के असते. 

वाचा – ST महामंडळात मोठी भरती, तब्बल १,५०,००० लाख मिळेल पगार

कोणाला याचा फायदा घेता येतो?

LIC Aadhar Shila Policy सुरक्षा आणि बचत दोन्ही मिळवून देते. ८ वर्षापासून ते ५५ वर्षाच्या कोणत्याही महिलेला याचा फायदा घेता येतो. ही योजना पॉलिसी धारक आणि त्याच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूनंतरतही आर्थिक मदत करते. 

वाचा – वृद्धांना मिळणार ५ हजाराचे पेन्शन, कसा करावा अर्ज

आधार शिला पॉलिसीचे विवरण 

न्यूनतम रक्कमरू. ७५,०००
अधिक रक्कमरू. ३,००,००० लाख 
पॉलिसीचा कालावधी१० ते २० वर्षे 
प्रिमियम भरण्याचा कालावधी१० ते २० वर्षे 
मॅच्युरिटीचे वय७० वर्ष 

LIC Aadhar Shila Yojana पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आधार शिला पॉलिसीचा ला कसा मिळेल?

तुम्ही जर ३० व्या वर्षी ही पॉलिसी घेतली तर प्रत्येक दिवशी ५८ रूपयांची बचत करून तुम्ही १ वर्षात २१,९१८ रूपये जमा करता. मॅच्युरिटीनंतर ७,९४,००० रूपये तुम्हाला परतावा मिळून २० वर्षात तुम्हाला ४,२९,३९२ रूपये भरावे लागतील. 

आधार शिला पॉलिसीसाठी काय गरजेचे?

  • ही योजना केवळ महिलांसाठी आहे 
  • याचा कालावधी १० ते २० वर्ष असून ८ व्या वयापासून ५५ व्या वयापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता
  • मॅच्युरिटीसाठी या योजनेचा अवधी ७० वर्ष आहे
  • या योजनेसाठी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज १ फोटो आणि स्वाक्षरी द्यावे 

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment