मुलींना समाजात जगताना कोणत्याही आर्थिक अडचणी येऊ नये. त्यांचे भविष्य उज्वल असावे यासाठी सरकारने मुलींसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. 2023 मध्ये जे बजेट सादर झाले त्यात या नव्या योजनेची ओळख करुन देण्यास आली आहे. या योजनेंतर्गत 75,000/- रुपयांचा लाभ मुलींना मिळणार आहे. लेक लाडकी योजना ( Lek Ladki Yojana) नेमकी काय आहे? ही योजना कोणासाठी आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे? या सगळ्याची माहिती आज या लेखातून घेणार आहोत. लेक लाडकी योजनेसोबत माझी भाग्यश्री कन्या योजना नेमकी काय आहे ? याची अधिक माहिती घ्यायला विसरु नका.
अधिक वाचा : मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल
Lek Ladki Yojana
9 मार्च 2023 रोजी लेक लाडकी योजनेची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे. या योजनेंतर्गंत ज्या मुलींचा जन्म गरीब कुटुंबात झाला आहे. अशा मुलींना याचा लाभ घेता येणार आहे. मुलींच्या संगोपनासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च हा या योजनेतून दिला जाणार आहे. वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेतून मिळणारे 75,000/- रुपये खात्यात जमा केले जाणार आहे. ही योजना मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे पिवळ्या आणि केशरी रंगाचे रेशनकार्ड आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना (2023) |
लाभाची रक्कम | 18 व्या वर्षी 75,000/- |
योजनेचा लाभ | आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुलीला |
उद्देश्य | मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे |
लेक लाडकी योजना आहे काय?
लेक लाडकी योजना ही खास गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना आर्थिक मदत करणारी आहे. ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रंगाचे रेशनकार्ड आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पिवळे आणि केशरी रंगाचे कार्ड हे आर्थिक दृष्ट्या कमी असलेल्यांनाच दिले जाते. त्यामुळे या योजनेचा लाभ फक्त पिवळे- केशरी रंगाचे कार्ड धारकच घेऊ शकतात. ज्यांच्या घरातकन्या जन्माला आली आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार मुलगी जन्मल्यानंतर 5 हजार रुपये मिळतील. त्यानंतर पहिलीत गेल्यानंतर 4,000/- हजार रुपये दिले जातील. सहावीत गेल्यानंतर मुलीला ६,०००/- , ११ वीत गेल्यानंतर 8,000/- रुपये आणि त्यानंतर मुलगी 18 वर्षाची झाली की, तिला संपूर्ण रक्कम 75,000/ – रुपये दिेले जाणार आहे.
अधिक वाचा : पोस्ट ऑफिस भरती: 20,000 पेक्षा अधिक शिपाई लिपिक पदांसाठी बंपर भरती, 10वी 12वी उत्तीर्णांसाठी संधी
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
लेक लाडकी योजना ही पूर्णपणे नवीन योजना आहे. या योजनेची नुकतीच घोषणा झाली आहे. ती अमलात आणण्यासाठी थोडा अवकाश आहे. दरम्यान ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायला आहे त्यांनी कोणती कागदपत्रे तयार ठेवायला हवीत ते जाणून घेऊया.
- आई-वडिलांचे आधारकार्ड
- मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र
- पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशनकार्ड
- कमाईचे प्रमाणपत्र
- निवासाचा दाखला
- बँक खात्याची माहिती
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट देऊन त्यासाठीचा अर्ज करा
महाराष्ट्र सरकार च्या काही महत्वाच्या योजना,
मोफत शिलाई मशीन योजना : सरकार देत आहे सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन , असा करा अर्ज
या दिवशी येतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येतील – नवीन यादी जाहीर
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा