गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

आपण शहरात बसूनही आपल्या गावाच्या जमिनीचा नकाशा पाहू शकतो. आपल्या जमिनीच्या हद्दी नक्की कोणत्या आहेत, जमिनीचा सातबारा कोणता आहे हे आपल्याला आता ऑनलाईन दिसू शकते. सरकारने गट क्रमांकानुसार आता सातबारा आणि ८-अ उताऱ्यासह जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. तुमच्याकडे योग्य गट क्रमांक असेल तर तुम्ही तुमच्या जमिनीची योग्य माहिती काढू शकता. याला MP Land Record असं म्हणतात. 

कसा पाहू शकता नकाशा?

  • सर्वप्रथम तुम्हाला जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी संकेतस्थळावर जावं लागेल. 
  • पेजच्या डाव्या बाजूला तुम्हाला Location असा पर्याय दिसेल
  • यात तुमचे राज्य, कॅटेगरीमध्ये Rural आणि Urban असे दोन पर्याय दिसतील
  • तुमची जमीन जर ग्रामीण भागामध्ये असेल तर Rural निवडा आणि शहरी भागात असल्यास Urban पर्याय निवडा 
  • त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा आणि सर्वात शेवटी village map वर जाऊन क्लिक करा

काय दिसते?

  • हे सर्व तुम्ही भरल्यानंतर तुमची जमीन ज्या गावात येते त्याचा नकाशा तुमच्या स्क्रिनवर दिसतो
  • Home पर्यायासमोर तुम्ही आडव्या बाणावर क्लिक करून तुमच्या जमिनीचा नकाशा संपूर्ण स्क्रिनवर पाहू शकता
  • त्यानंतर डावीकडे + किंवा – या चिन्हावर क्लिक करा आणि नकाशा मोठा अथवा लहान होईल
  • तर त्यानंतर डावीकडे एकाखाली एक ३ आडव्या रेषा दिसतात, त्यावर क्लिक केल्यास, पहिल्या पेजवर जाता येते 

असा काढा नकाशा 

  • सदर पेजवर search by plot number असा एक पर्याय दिसतो
  • त्यावर तुम्हाला तुमच्या ७/१२ उताऱ्याचा क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर जमिनीचा नकाशा दिसतो
  • डावीकडे Plot Info मध्ये जमीन नक्की कोणाच्या नावावर आहे आणि किती आहे याची सविस्तर माहिती येते 
  • ही माहिती तुमची पाहून झाली की, त्यावर सर्वात शेवटी Map Report नावाचा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट येतो. तर उजव्या बूजाला Download Arrow वर क्लिक करून तुम्ही हा रिपोर्ट डाऊनलोड करून घेऊ शकता

नकाशा पाहण्यासाठी करा यावर क्लिक 

ही अत्यंत सोपी प्रक्रिया असून तुम्हाला सहज तुमच्या जमिनीची माहिती सविस्तर पद्धतीने मिळू शकते. 

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment