जाणून घ्या तुमचा CBIL स्कोअर एका क्लिकमध्ये

बँकेकडून Loan घ्यायचे असेल तर ते थेट दिले जात नाही. तर तुमचा CBIL स्कोअर तपासला जातो. जर तुमचा हा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला इच्छित लोन मिळण्यास मदत मिळते. खूप जणांना आपल्याला किती लोन मिळेल हे जाणून घ्यायचे असते. पण तुम्हाला बँक किती लोन देऊ शकेल हे माहीत नसते. पूर्वी CBIL तपासण्यासाठी बँकेत जावे लागत होते किंवा बँकेच्या कर्मचाऱ्याला भेटणे आणि जाणून घेणे गरजेचे होते. पण आता तसे अजिबात राहिलेले नाही. आता ते इतके सोपे झाले आहे की, तुम्हाला एका क्लिकमध्ये आणि काहीच सेकंदात तो काढता येईल. आज आपण त्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत.

अधिक वाचा
रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई
Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी असा करा अर्ज, मिळवा मोफत घर
आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!

CBIL स्कोअर म्हणजे काय?

ज्यावेळी तुम्हाला अतिरिक्त पैशांची गरज असते. त्यावेळी लोन हा पर्याय अनेक जण स्विकारतात. बँक तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला काही आगाऊ रक्कम देते. ती रक्कम तुम्हाला काही कालावधीत परत करायची असते. ही सर्वसाधारण लोन प्रक्रिया आहे. ज्यावेळी तुम्ही ही रक्कम घेता त्यानंतर ती बँकेला परत करताना वेळेवर देणे गरजेचे असते. त्यावरच तुमचा CBIL स्कोअर अवलंबून असतो. तुम्ही घेतलेले अगदी कोणतेही लोन वेळच्या वेळी पूर्ण करणे गरजेचे असते. तसे केले तरच तुमचा स्कोअर चांगला होतो. कारण लोनची घेतलेली रक्कम वेळेवर परत करणे हेच बँकेला हवे असते. त्यामुळे तुमच्यावरील विश्वास हा अधिक वाढतो. याचाच अर्थ असा की, पुढील काळात बँक तुम्हाला थोडी जास्त रक्कम लोन म्हणून देऊ शकते.

त्यामुळे ज्यांना मोठ्या गोष्टी आयुष्यात घ्यायच्या असतील तर त्यांनी लोन घेताना आपला CBIL स्कोअर हा चांगला ठेवणे गरजेचे आहे.

असा तपासा तुमचा CBIL स्कोअर

हल्ली आपण सगळेच Google Pay सारखे ॲप वापरतो. त्यावरच तुम्हाला तुमचा CBIL स्कोअर कळणार आहे.

  1. Google Pay app वर गेल्यानंतर थोडे स्क्रोल करुन खाली या त्यात check your CBIL score for free असा पर्याय दिसेल.
  2. त्यावर क्लिक करा. एक नवी विंडो ओपन होईल. तुमची बँक गुगल पे ला जोडलेली असेल तर तुम्हाला फक्त Continue वर क्लिक करुन पुढे जायचे आहे.
  3. त्यानंतर तुमचा स्कोअर समोर येईल.
  4. CBIL स्कोअर हा दर महिन्याला थोडा फार बदलत असतो. तुमचा स्कोअर हा नेहमी 750 च्या वर असायला हवा.
  5. CBIL स्कोअर लाल रंगात दिसत असेल तर तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.
    त्यामुळे तुमचा स्कोअर चांगला राहण्यास मदत मिळेल.

तुमचा CBIL स्कोअर तपासण तसे खूपच सोपे आहे. लोन घेण्याचा विचार करण्यापूर्वी तुम्ही CBIL स्कोअर नक्की तपासा.

Leave a Comment