आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही कसे तपासाल, सोपी पद्धत

Aadhar Card – Pan Card Linking Process: आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसह लिंक असावं यासाठी सध्या अनेकांवर ताण येतोय. काही जणांना याची नक्की ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे हे माहीत नाही. त्यामुळे बँकेत जाऊन तासनतास ताटकळत उभं राहण्याशिवाय पर्याय नाहीये.

तुम्ही आधार-पॅन लिंक केलंय की नाही हे पाहण्याची सोपी पद्धत आहे. जाणून घ्या, कारण हे लिंक नसल्यास, तुम्हाला वेळीच लिंक करून घ्यावे लागले अन्यथा खिशातील १००० रूपये घालवयाला तयार राहा. 

कसा कराल स्टेटस चेक (How To Check Aadhar Pan Link)

  • सर्वात पहिल्यांदा ही लिंक ओपन करा – https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status
  • त्यानंतर तुम्हाला पॅन आणि आधार कार्डाचे नंबर्स विचारण्यात येतील
  • View Link आधार स्टेटसवर तुम्ही क्लिक करा (View Link  Aadhar Status)
  • तुम्हाला स्टेट्स समजून जाईल.

लिंक नसल्यास कसे भराल पैसे?

तुमचे अकाऊंट e-Pay टॅक्स ऑथोराईज्ड असल्यास खालील पद्धतीने तुम्ही लेट फी भरू शकता. 

  • सर्वात पहिल्यांदा ई-फायलिंग पोर्टल पेजवर जा आणि Quick Link सेक्शनवरील लिंक आधारावर क्लिक करा
  • आपला पॅन आणि आधार नंबर टाईप करा
  • e-Pay टॅक्स पर्याय निवडा
  • पॅनचे तपशील लिहा आणि कन्फर्म करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल
  • ओटीपी भरल्यावर e-Pay टॅक्स पेजवर जा आणि त्यावरून Income Tax Tile वर क्लिक करा 
  • Assessment 2023-24 आणि पेमेंट टाईप निवडा
  • रक्कम भरल्यावर बँकचा पर्याय निवडून सबमिट करावे

Validate कसे कराल?

  • ई-फायलिंगवर क्लिक रून लॉगिन करा
  • प्रोफाईल सेक्शनमधील लिंक आधार सेक्शनवर जाऊन आधार लिंकवर क्लिक करा
  • ई-फायलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि क्विक लिंक्सअंतर्गत लिंक आधारवर जा
  • पॅन आणि आधार नंबर टाईप करून Validate करा
  • मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाईप करून Validate करा
  • तुमचे आधार लिंक करून प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर स्टेटस तपासून पाहू शकता

महाराष्ट्र सरकार च्या काही महत्वाच्या योजना,

मोफत शिलाई मशीन योजना : सरकार देत आहे सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन , असा करा अर्ज

या दिवशी येतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येतील – नवीन यादी जाहीर

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment