देशभरात अलर्ट! Mocha वादळाचा बसणार फटका

सध्या अवकाळी पावसाने संपूर्ण देशात थैमान घातलेले असताना आता आणखी एका वादळामुळे देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. Mocha असे या वादळाला नाव देण्यात आले आहे. बंगालच्या खाडी हे वादळ येणार असून 9 मे पासून ते 11 मे पर्यंत सगळ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सग्ळ्यात जास्त फटका हा बंगाल आणि त्याच्या आजूबाजूच्या परीरसराला होणार असे सांगितले जात आहे. IMD ( indian Metrological Department) ने या संदर्भात एक पत्रक देखील जारी केले आहे. यामध्ये राज्यांची यादी देखील देण्यात आली आहे ज्यांना याचा फटका बसणार असे सांगितले जात आहे.

समुद्र किनाऱ्यापासून दूर राहा

आतापर्यंत आलेल्या अनेक वादळांनी आपल्याला चांगलेच नुकसान केले आहे. विशेषत: जे समुद्रकिनाऱ्यालगत राहतात त्यांना याचा अधिक फटका बसला आहे. आताही समुद्र किनारी राहात असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. हवामान खात्याकडून या वादळाची तीव्रता ही जरी अद्याप जाहीर करण्यात आली नसली तर काही राज्यांची यादी दिली आहे. ज्यांना याचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे असे सांगितले आहे. त्यानुसार खालील राज्यांना याचा फटका बसणार आहे.

अधिक वाचा
SBI बँकेत खाते असेल तर नक्की वाचा, पैसे काढताना…
रिटायर्ड कर्मचाऱ्याला मिळू शकते जास्त पेंशन, जाणून घ्या कसे
या ३ स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल तर गुंतवणुकदारांचा खिसा होईल गरम, जाणून घ्या


  1. तामिळनाडूृ- अति पाऊस आणि वादळाचा धोका
  2. ओडिसा- ओडिसाला सलग 4 वर्ष वादळाचा त्रास झाला आहे आणि आता पुन्हा एकदा वादळाचा धोका आहे
  3. पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालला या वादळाचा अधिक धोका आहे असे सांगितले जात आहे. या ठिकाणी 7 तारखेपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे येथे पाऊस आणि वादळाचा धोका असे दोन्ही जाणवणार आहे. समुद्र किनाऱ्याजवळील सगळ्या शहरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  4. आंध्रप्रदेश- आंध्रप्रदेशला देखील काही अंंशी याचा फटका बसणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणीही खूप पाऊस, विजा चमकणे असा त्रास होणार आहे.

मासेमारी बंद

वादळाची तीव्रता लक्षात घेता ऐन मे महिन्यात मासेमारी करणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. कारण या ठिकाणी काही काळासाठी मासेमारी ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे किनाऱ्यालगत आणि समुद्रात कोणतीही काम केली जाणार नाहीत. या पूर्वी मे महिन्यात आलेल्या वादळांचे क्रेंद माहीत असले तरी देखील त्याचा रोख कुठे याचा अंदाज लावणे फारच कठीण होते. म्हणूनच आताही या वादळाची माहिती काढणे कठीण आहे.

महाराष्ट्राला याचा धोका नसला तरी देखील अवकाळी पाऊस आणि गेल्या काही वर्षात आलेली वादळ पाहता काळजी घेणेच अधिक चांगले आहे.

Leave a Comment