सरकारी नोकरी ही नेहमीच सर्वांना हवीशी वाटते आणि त्याची कारणंही तशीच आहेत. भरमसाठ पगार हे त्यातील मुख्य कारण आहे. तसंच केंद्र सरकार हे प्रत्येक ६ महिन्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवत असते. यावर्षी सरकारकडून ४% महागाई भत्ता वाढ करण्यात आल्यास, जवळपास ४६ टक्क्यावर पगार पोहचू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचा सर्वात जास्त फायदा हा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल असे म्हटले जात आहे.
कसा होईल फायदा?
पहिल्या सहामाहीमध्ये जानेवारी ते जून २०२३ दरम्यान केंद्र सरकारकडून DA मध्ये साधारणतः ४% वाढ करण्यात आली होती. तर वाढीनंतर महागाई भत्ता हा ३८ टक्क्यांवरून ४२% झाल्याचे दिसून आले. केंद्र सरकार दर ६ महिन्याने यात वाढ करत असून आता जर चार टक्क्यांनी वाढ झाली तर महागाई भत्ता हा ४६% वर पोहचेल.
पगारात किती वाढ होणार?
कसे आहे या पगारवाढीचे गणित जाणून घ्या. याचे गणित बेसिक पगारानुसार तयार होते. म्हणजे नेमके काय तर पाहा-
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार १८,००० रूपये आहे – ४२% टक्केच्या गणिताने, डीए अर्थात महागाई भत्ता होईल ७५६० रूपये. तर यामध्ये ४६% महागाई भत्ता वाढल्यास, पगारामध्ये ८२८० रूपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच पगारात दर महिन्याला ७२० रूपये इतकी वाढ होईल.
यासंदर्भात अजून सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र गेल्यावर्षी दुसऱ्या तिमाहीत चार टक्के वाढ झाल्यामुळे हा अंदाज लावण्यात येत आहे.
निर्देशांकाच्या आधारे मोजमापणी
दर महिन्याला कामगार ब्युरोकडून जारी करण्यात आलेल्या औद्योगिक कामगारांच्यासाठी CPI-W ग्राहक किंमत ही निर्देशांकाच्या आधाराने मोजली जाते. कामगार मंत्रालयाचा Labour Bureau हा भाग असतो. याची मोजणी ही Consumer Price Index च्या आधारावर होताना दिसते.
महागाई भत्त्याची नेमकी सुरूवात कधी?
दिवसेंदिवस होणारी महागाई आणि राहणीमानाचा स्तर कायम ठेवण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा सरकारकडून देण्यात येतो आणि १९७२ पासून याची सुरूवात झाली. सर्वात आधी मुंबईमध्ये याची सुरूवात झाली आणि त्याचे अनुकरण केंद्र सरकारेन करत केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही महाभाई भत्ता द्यायला सुरूवात केली.
अधिक वाचा –
10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023
मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज
UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा
कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा