शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. अनेक शेतकरी तर सावकारी कर्जांच्या ओझ्याखाली दबले जातात. पण सरकारकडून शेतीसाठी लागणारे कर्ज कशा पद्धतीने काढता येते अथवा शेती कर्जाचे नक्की किती प्रकार आहेत हे जाणून घ्या. ज्या नव्या शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचे आहे, त्यांनी ही माहिती नक्की वाचावी.
पीक कर्ज अर्थात Working Capital
प्रत्येक वर्ष खर्च येतात त्याला पीक कर्ज असे म्हटले जाते. यामध्ये बी-बियाणे, अंतर्गत मशागती, खते आणि पिकांसाठी लागणारे औषध, लेबर खर्च समाविष्ट होतो. या सर्वाचा खर्च पीक कर्जाच्या अंतर्गत येतो. जमिनीची मशागत करण्यापासून ते पिकाच्या शेवटच्या काढणीपर्यंतचा खर्च या कर्जामध्ये समाविष्ट असतो.
कर्जाची वैशिष्ट्येः
- हे पीक कर्ज तुम्ही काढल्यानंतर वर्षातून कितीही वेळा भरू शकता
- हे कर्ज कितीही वेळा काढू शकता
- बँक हे कर्ज भरण्यासाठी एक विशिष्ट मुदत देते आणि तुमच्याकडे मध्ये पैसे आले तर त्यावेळी तुम्ही पैसे मध्येच भरू शकता
- मध्येच पैसे भरल्याने शेतकऱ्याचे व्याज वाचते
- गरज पडेल तेव्हा पैसे काढून घेऊ शकता आणि वर्षातून असं तुम्ही कितीही वेळा करू शकता
- कर्जाची मुदत १ ते ३ अथवा ५ वर्षांपर्यंत असू शकते
मुदत कर्ज अथवा Term Loan
शेतीसंबंधित व्यवसाय अथवा शेतीसंबंधित एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्यासाठी काढण्यात येणाऱ्या कर्जाला मुदत कर्जा म्हणतात. यामध्ये तुम्ही पोल्ट्री फार्म, पाईप लाईन, गाई म्हशींची खरेदी, ट्रॅक्टर घेणे अथवा शेतीची अवजारे खरेदी करणे यासाठी हे कर्ज घेतले जाते.
- शेती सुरू करायच्या आधी या कर्जाची मदत लागते
- मात्र यामध्ये एकदा पैसे भरले की काढणे शक्य होत नाही
- याची मुदत साधारण ३ ते ७ वर्षे असू शकते
- तुम्ही कोणते कर्ज काढत आहात यावर तुमची पीक पद्धती अवलंबून राहाते
माल तारण कर्ज अर्थात Pledge Loan
काजू, सोयाबीन, मका, बेदाणा अशी पिके तुम्ही तुमच्या बँकेकडे गहाण ठेऊन त्यावर कर्ज काढू शकता.
हफ्ते कसे भरावेत
पीक कर्जासाठी पीक पद्धतीनुसार साधारणतः सहा महिने अथवा वर्षातून एकदा नवे – जुने करणे अथवा सदर फिरवून घेणे गरजेचे असते. याची परतफेड करण्याची मुदत ५ वर्षे आहे. पाच वर्षे तुम्ही नवे-जुने करू शकता मात्र ५ वर्षाने तुम्हाला नवे कर्ज काढावे लागते.
तर मुदत कर्जासाठी साधारण ३-५ किंवा ७ वर्षाची मुदत असते. याचा हफ्ता अथवा मुदत हे तुमच्या उत्पादनच्या चक्रानुसार ठरते. उत्पादन येते त्यानुसार तुम्हाला समान हफ्ते नेमून देण्यात आलेले असतात, त्यानुसार कर्ज फेडावे.
10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023
मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा