केंद्रीय पासपोर्ट विभागात रिक्त पदांची भरती प्रक्रिया करण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. यासाठी कोणती पदे रिक्त आहेत आणि कसा अर्ज करायचा पाहा.
अर्जाची प्रक्रिया
जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर (खाली दिलेल्या लिंकवर जाहिरात पाहावी) नमूद पात्रताधारक उमेदरावांना आपला अर्ज २७ मे, २०२३ मध्ये पोहचेल अशा पद्धतीने सादर करावा. सदर भरतीसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पासपोर्ट अधिकारी
पासपोर्ट अधिकारी पदांसाठी ०२ रिक्त जागा असून मान्यताप्राप्त संस्था अथवा विद्यापिठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान ९ वर्षांचा अनुभव असायला हवा.
उप-पासपोर्ट अधिकारी
उप-पासपोर्ट अधिकारी पदांसाठी एकूण ०९ जागा रिक्त असून पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदाकरिता उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्था अथवा विद्यापिठातून पदवीधारक असावा. तसंच संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव अधिकाऱ्याला असणे आवश्यक आहे.
पदासाठी वेतन
सातव्या वेतन आयोगानुसार जे उमेदवार निवडले जातील त्यांना 67,700/- ते 2,09,200/- या श्रेणीमध्ये वेतन देण्यात येईल. याशिवाय सदर वेतनासह अन्य अनुज्ञेय वेतन आणि भत्तेदेखील लागू होतील.
10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023
मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा