BSNL ग्राहकांना देणार मोफत इंटरनेट, आजच घ्या लाभ

कितीही नेटवर्क कंपन्या आल्या तरी देखील आजही BSNL ने दुर्गम भागातील ग्राहकांना धरुन ठेवले आहे. इतर नेटवर्क कंपन्यांच्या तुलनेत सेवा पुरवणाऱ्या BSNL ने आता ग्राहकांसाठी अशी काही सुविधा आणली आहे. ज्यामुळे इंटरनेटचा वापर करणे ग्राहकांना फार सोपे जाणार आहे. कारण पहिल्या तीन महिन्यांसाठी BSNL ग्राहकांना फ्री इंटरनेटची सेवा पुरविणार आहे. BSNL ने अत्यंत स्वस्त अशी योजना खास ग्राहकांसाठी आणली आहे. त्यानंतरच ग्राहकांना हा लाभ घेता येणार आहे. नक्कीच ही सेवा काय आहे? आणि हा प्लॅन आहे तरी काय? चला घेऊया जाणून

महत्वाचे मुद्दे

BSNL Work From Home Plan

BSNL च्या या योजनेचे नाव BSNL Work From Home Plan असे आहे. कोरोना काळाासून अनेकांची कामे ही घरातून सुरु आहेत. अशावेळी इंटरनेट ही सगळ्यांचीच बेसिक गरज आहे. ती गरज ओळखून हा प्लॅन आणला आहे. 84 दिवसांचा हा डेटा प्लान असून यामध्ये इंटरनेटचा पुरेपूर वापर करता येणार आहे. स्पीड इंटरनेटसह मिळणाऱ्या या प्लॅनमध्ये दिवसाला 3GB डेटा मिळणार आहे. तो संपला की, त्याचा स्पीड कमी होईल पण तुम्हाला इंटरनेटचा वापर करता येईल.
या डेटा प्लानची किंमत 599/- इतकी आहे. त्यामध्ये दिवसाला 100 मोफत मेसेज आणि रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत मोफत इंटरनेट मिळणार आहे. आहे की नाही फायद्याची डिल!

प्लॅनचे नावBSNL Work From Home Plan
किंमत599/-
इंटरनेट सुविधा 3 GB प्रत्येक दिवस, रात्री अनलिमिटेड
इतर सुविधामोफत SMS

असे करा रिचार्ज

BSNL चे हे रिचार्ज करणे फारच सोपे आहे. तुम्हाला या प्लॅनची अधिक माहिती हवी असेल तर https://portal2.bsnl.in/myportal/ मध्ये जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅनची माहिती घेता येईल. प्रत्येक राज्यानुसार प्लॅनमध्ये काही बदल असू शकतील. WFH या शॉर्टफॉर्ममध्ये तुम्हाला हा प्लॅन दिसेल. पण वरील सांगितलेला प्लॅन तुम्हाला हवा असेल तर तो प्लॅन योग्य पद्धतीने शोधणे देखील तितकेच गरजेचे आहे. तुम्हाला योग्य किंमत आणि प्लॅनचे नाव कळले की मग तुम्ही Paytm, Googlepay, Phonepe या प्लॅटफॉर्मवरुनही रिचार्ज करु शकता.

अधिक वाचा

पॅन कार्ड ऑनलाईन बनविण्याची वापरा सोपी पद्धत
वृद्धांना मिळणार ५ हजाराचे पेन्शन, कसा करावा अर्ज
‘आता प्रत्येक घरी शौचालय’, सरकार करणार 12000 ची मदत- Free Toilet

Leave a Comment