Whatsapp वर येणारे हे कॉल अजिबात उचलू नका, व्हाल कंगाल

Whatsapp हा आपल्या स्मार्ट फोन युजरसाठी फारच महत्वाचा असा ॲप आहे. मेसेजच नाही तर फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट सगळे काही पाठवण्यासाठीचा हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळेच सहज अशा संवादासाठी आपण सगळेच त्याचा वापर करतो. पण याच माध्यमातून सध्याच्या घडीला अनेक स्कॅम होऊ लागले आहेत. सध्या यामधून जो स्कॅम सुरु आहे त्याने अनेकांचे अकाऊंट शून्य झाले आहे. त्यामुळेच खूप सावध राहून हा ॲप वापरणे गरजेचे आहे. तुम्हाला Whatsapp वर एखादा कॉल येत असेल तर थोडे जपून कोणताही कॉल उचलतना विशेष काळजी घ्या.

व्हिडिओ कॉल उचलू नका

Whatsapp वरुन आपण एकमेकांना व्हिडिओ कॉल करत असतो. कधी कधी एखाद्या अनोळखी क्रमांकावरुन आपल्याला फोन येतो. अचानक माहिती नसताना आपण तो फोन उचलतो. अशावेळी समोर एखादी नग्न बाई किंवा पुरुष असतो. तुम्ही फोन उचलल्यामुळे तुमच्या चेहऱ्याची क्लिप हे स्कॅमर रेकॉर्ड करतात. हा फोन कट करुन त्याचा एक एडिटेड व्हिडिओ बनवतात आणि तो तुम्हालाच पाठवतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते तुम्हाला ब्लॅकमेल करतात. तुमची सोशल मीडियावरील माहिती काढून तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.

हा फोन काही विशिष्ट देशांमधून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची यादी पुढे देणार आहोत. दरम्यान असे कॉल आले की अशा नंबरला तुम्ही लगेच ब्लाॅक करा.

WFH वर्क फ्रॉम होमची संधी

घरी बसल्या चांगले पैसे कमवण्याचे पर्याय अनेक जण शोधत असतात. पण सध्या खूप ठिकाणी चांगलाच फ्रॉड सुरु आहे असे दिसत आहे. घरबसल्या दिवसाला 5000/- 10,000/- कमाई होण्याची हमी देतात. सुरुवातीला ते कमीत कमी कामातून चांगला पैसा देतात. पण एकदा का तुम्हाला त्यांच्यावर विश्वास बसला की, मग ते तुम्हाला काही रक्कम गुंतवण्यास सांगतात. तुम्ही जितके कमावले त्याच्या चौपट पैसा तुमच्याकडून वसून करुन देण्यासाठी ते भाग पाडतात. यासाठी ते लिंक्स पाठवतात. तुमच्या फोनवर UPI काम करत असेल तर त्यातून पैसा काढून येण्यास हे ॲप समर्थ असतात.

लिंक्स पाठवून लूट

काही चांगल्या ऑफर्स सांगून तुम्हाला लुटण्याचाही एक वेगळाच प्रकार या Whatsapp मार्फत सुरु आहे. यातही मोठ्या प्रमाणात वाढ सुरु झाली आहे. यामध्ये तुम्हाला चांगल्या ऑफर्स सांगून काही लिंक्स पाठवल्या जातात. या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोन स्कॅम होऊ शकतो. तुमचे सगळे पासवर्ड त्यामुळे माहिती होऊ शकतात. त्यामुळे तुमची सगळी खासगी माहिती मिळण्यास मदत मिळते.

या देशातून येतात फोन

भारताचा कोड +91 हा आहे. त्यामुळे जो पर्यंत आपले कोणी परदेशात नाही अशांनी वेगळ्या कोडने सुरु होणाऱे फोन उचलू नये. जसे की, +62, +92, +262 , +473, +268 असे काही कोड असतील तर असा फोन उचलू नका.

अधिक वाचा

दर महिन्याला २ ते ६ लाख कमाविण्यासाठी घ्या ही फ्रेंचायझी आणि व्हा मालामाल
नोकरीचा आला असेल कंटाळा, तर लाखो कमाविण्यासाठी करा हे काम
रिटायर्ड कर्मचाऱ्याला मिळू शकते जास्त पेंशन, जाणून घ्या कसे

Leave a Comment