कोकणप्रेमींसाठी खुषखबर!!! मध्य रेल्वे चालवणार २६ उन्हाळी विशेष गाड्या

सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.  मध्य रेल्वेने याआधीच ९१६ उन्हाळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि या अतिरिक्त उन्हाळी विशेषसह या वर्षी एकूण उन्हाळी स्पेशलची संख्या ९४२ होईल. २६ विशेषचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

01129 विशेष दि. ६.५.२०२३  ते ३.६.२०२३ पर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.३० वाजता पोहोचेल.

वाचा – डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?

01130 विशेष दि. ७.५.२०२३  ते ४.६.२०२३ पर्यंत दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी थिवि येथून १६.४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.

थांबे

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

संरचना

एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय, १० शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी. 

वाचा – LIC Aadhar Shila Policy: गुंतवा रोज ५८ रूपये आणि मिळवा तब्बल ८ लाख

आरक्षण 

विशेष गाडी क्रमांक 01129/01130 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ४.५.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सूरु होईल.

तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in  ला भेट द्या किंवा NTES ॲप डाऊनलोड करा. 

प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 

आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment