‘मुलगी शिकली प्रगती झाली’ हे वाक्य गेले अनेक वर्ष आपण ऐकत आहोत. पण अनेक खेड्यापाड्यात अजूनही मुलींना शिक्षण मिळत नाहीये. यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. यापैकी ४ योजना ज्या तुमच्या मुलींच्या भविष्यासाठी ठरतील उज्ज्वल. याबाबत अधिक माहिती घ्या जाणून.
बेटी बचाओ बेटी पढाओ
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही केंद्र सरकारची देशभरातील मुलींसाठी आखण्यात आलेली योजना आहे. सामाजिक समस्यांपासून मुलींचा बचाव करून लिंगाशी संबंधित गर्भपाताला आळा घालणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुलींचा जन्मदर कमी असणाऱ्या जिल्ह्यांपासून याची सुरूवात करण्यात आली. या योजेनेचे अन्य उद्देश –
- लैंगिक समानतेचे समर्थन करून महिला भ्रूणहत्या आणि गर्भपाताला प्रतिबंध करणे
- मुलीच्या वारसा हक्काचे संरक्षण करण्यसाठी
- मुलींची वाढ योग्य व्हावी यासाठी योग्य वातावरणनिर्मिती
- बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी
सुकन्या समृद्धी योजना
भारत सरकारद्वारे सर्व मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून सध्या या योजनेची अधिक चर्चा आहे. मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी योग्य बचत व्हावी यासाठी या योजनेचा पालक लाभ घेऊ शकतात. एका मुलीसाठी एक खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडून बचत करता येऊ शकते. कशी आहे योजना –
- एका वर्षात पालकांना मुलीसाठी २५० रूपयांपासून ते १.५० लाखापर्यंत खात्यात संचय करता येतो
- महत्त्वाचे म्हणजे या खात्यात जमा आणि काढलेल्या रकमेवर कर सवलत आहे
- २१ वर्षांपर्यंत या खात्याचा कालावधी तुम्ही ठेऊ शकता
- मुलीच्या १८ व्या वर्षानंतर खात्यातून ५० टक्के रक्कम काढता येऊ शकते
- रोख, धनादेश, डीडी अथवा ऑनलाईन ट्रान्सफर करून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो
माझी कन्या भाग्यश्री योजना
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत ज्या मुली दारिद्र्यरेषेखाली जन्म घेतात त्यांच्या नावाने २१,२०० रूपये एक वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळ योजनेत गुंतवावे. या मुलीला वयाच्या १८ व्या वर्षानंतर एकूण १ लाख रूपये रक्कम मिळेल. कशी आहे योजना –
- मुलीच्या जन्मानंतर पहिल्या ५ वर्षांसाठी आईकडे ५००० हजार रूपये देण्यात येतात
- ५ व्या इयत्तेत गेल्यानंतर वर्षाला मुलीला २५०० रूपये
- १२ व्या इयत्तेत गेल्यानंतर वर्षाला ३००० रूपये
- तर वयाच्या १८ व्या वर्षानंतर शिक्षणासाठी १ लाख रूपये मिळतात. मात्र यासाठी मुलीचा जन्म हा दारिद्र्यरेषेखाली असायला हवा
बालिका समृद्धी योजना
बालिका समृद्धी योजना ही सुकन्या समृद्धीशी मिळतीजुळती आहे. मात्र पालकांना बचत करण्याची संधी कमी आहे. कशी आहे योजना –
- बालिका समृद्धी योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५०० रूपये देण्यात येतात
- जी मुलगी शाळेत जाते तिला ३०० ते १००० रूपये स्कॉलरशिप ही १० वी इयत्तेप्रमाणे दिली जाते
- एखादे कुटुंब आपल्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकते
- यासाठी कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असण्याची गरज आहे
- तुमच्या जवळच्या बँकेत तुम्ही बालिका समृद्धी योजना खाते उघडू शकता
आपल्या मुलींसाठी सरकारने केलेल्या या ४ योजनांचा लाभ नक्की तुम्ही घ्यायला हवा. शिक्षण आणि मुलींच्या भवितव्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
महाराष्ट्र सरकार च्या काही महत्वाच्या योजना,
मोफत शिलाई मशीन योजना : सरकार देत आहे सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन , असा करा अर्ज
या दिवशी येतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येतील – नवीन यादी जाहीर
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा