वृद्धांना मिळणार ५ हजाराचे पेन्शन, कसा करावा अर्ज

कष्टकरी आणि गरीब वृद्धांसाठी नक्की काय योजना असतात याबाबत अनेकांना माहीत नसते. वृद्धापकाळात अनेकांना काटकसरीने आयुष्य घालवावे लागते. अशा गरीब वृद्धांसाठी सेवानिवृत्तीसाठी बचत आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मदत म्हणून असंघटित कामगारांसाठी भारत सरकारने पेन्शन योजना काढली आहे. सेवानिवृत्ती स्वेच्छेने बचत करण्यासाठी प्रवृत्त करणे हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. 

यासाठी भारत सरकारने २०१५-१६ च्या अर्थसंकल्पामध्ये अटल पेन्शन योजना (APY) जाहीर केली होती. ही योजना नक्की कसे काम करते आणि वृद्धांना कशी मदत होऊ शकते जाणून घ्या. 

अटल पेन्शन योजनेची उद्दिष्टे 

  • अटल पेन्शन योजना ही ६० वर्षांवरील सर्व भारतीयांना मासिक निवृत्ती वेतन देण्यासाठी स्थापन केली होती
  • गरीब, असंघटित कामगार आणि वंचित व्यक्तींसाठी ही योजना आहे 
  • रू. १००० ते ५००० इतकी दर महिन्याला किमान मासिक पेन्शनची हमी यात देण्यात आली आहे
  • PFRDA अर्थात पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरीटीद्वारे नॅशनल पेन्शन सिस्टिम रचनेद्वारे नियंत्रित करण्यात येते

वाचा – गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

कमतरता असल्यास सरकारकडून निधी 

सदर निवृत्तीवेतनाची हमी ही भारत सरकारकडून देण्यात येते. तसंच निवृत्ती वेतन योगदानावरील वास्तविक प्राप्त परतावा हा अंशदानाच्या कालावधीत अपेक्षित परताव्यापेक्षा कमी असल्यास, अशी कमतरता भारत सरकारकडून पूर्ण करण्यात येईल. पहिल्या ५ वर्षांसाठी ग्राहकाच्या योगदानाच्या ५० टक्के अथवा रू. १००० शी मिळताजुळता असा हिशेब जुळविण्यात येईल. 

अटल पेन्शन योजना खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

कसे उघडाल खाते 

  • ज्या बँकेत अथवा पोस्टात बचत खाते असेल तिथेच खाते उघडा. ग्राहकाजवळ बचत खाते नसल्यास बँकेत उघडा 
  • बचत बँक खात्यात किती पैसे भरणार ते भरा आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने APY फॉर्म भरा 
  • आधार आणि मोबाईल क्रमांक नोंदवा. हे अनिवार्य नाही मात्र पुढील व्यवहारासाठी योग्य ठरेल
  • मासिक, तिमाही आणि सहामाही पैसे भरू शकता

वाचा – शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती

यासाठी पात्रता काय 

  • १८ ते ४० वयोगटातील भारतातील सर्व नागरिकांसाठी उपयुक्त
  • आधार कार्डद्वारे प्राथमिक KYC करता येईल
  • अनिवासी भारतीय यामध्ये खाते उघडू शकत नाहीत
  • APS योजनेच्या काळात भारतीय नागरीक NRI झाल्यास खाते बंद करण्यात येईल  

कधी मिळतील पैसे 

वयाच्या ६० व्या वर्षी १०० टक्के पेन्शन काढण्याची अनुमती आहे. तसंच एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वा तिच्या नामनिर्देशित व्यक्तीला पेन्शन कॉर्प्स दिले जातील. 

  • APY खात्यामध्ये नामांकित व्यक्तीला विवरण देणे अनिवार्य आहे. जर विवाहीत असतील व्यक्ती तर त्याचे जीवनसाथी डिफॉल्ट स्वरूपात नामांकित असतील
  • अविवाहीत व्यक्तीसाठी अन्य व्यक्तीचे नाव नामांकित करणे आवश्यक आहे. लग्नानंतर जोडीदाराचे नाव नोंदवावे
  • एका व्यक्तीला एकच खाते उघडता येते
  • खात्यातील रक्कम, क्रेडिट इत्यादीबाबत ग्राहकांना SMS द्वारे सूचित करण्यात येईल

10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023

मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment