या ३ स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल तर गुंतवणुकदारांचा खिसा होईल गरम, जाणून घ्या

शेअर मार्केट म्हणजे खरं तर एक प्रकारचा जुगारच. लागला तर धनवान नाहीतर कंगाल. कधी कोणत्या कंपनीत लक्षणीय नफा मिळेल आणि कधी कोणत्या कंपनीचा शेअर खाली घसरेल याचे गणित फारच कमी जणांना कळते. मात्र काही कंपनीज अशा आहेत ज्या सध्या टॉपवर आहेत आणि मागच्या आठवड्यात या कंपनीजमध्ये ज्या गुंतवणुकदारांनी पैसा गुंतवला आहे त्यांचा नक्कीच खिसा गरम झाला आहे. तुम्हीही जाणून घ्या कोणत्या आहेत या कंपनीज. 

लार्सन अँड टूब्रो

Larsen And Toubro ही कंपनी गेले अनेक वर्ष भारतातील प्रसिद्ध कंपनीजपैकी एक राहिली आहे.  गेल्या आठवड्यामध्ये कंपनीजच्या शेअर्समध्ये १४९ पेक्षा जास्त वाढ झाली असून, सुमारे ६.७४ टक्के इतकी ही वाढ नोंदविण्यात आली आहे. उदाहरणार्थ २१ एप्रिल रोजी ज्या शेअर्सची किंमत २२१५ रूपये इतकी होती त्याची किंमत ही २३६४ रूपये इतकी वाढली आहे. मागच्या आठवड्यातील उच्चांक २३६९ इतका असून निचांक २१८६.५५ इतका होता. 

वाचा – डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?

स्टेट बँक ऑफ इंडिया 

State Bank Of India ही भारतातील सर्वाधिक वापरली जाणारी बँक असून बँकिंग स्टॉकची किंमत ही ६.४७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. २१ एप्रिल रोजी ज्या शेअर्सची किंमत ५८३ इतकी होती त्याची किंमत वाढून ५७८ च्या वर गेलेली दिसून आली. एक आठवड्याचा साधारण उच्चांक हा ५८०.४५ आहे. 

वाचा – LIC Aadhar Shila Policy: गुंतवा रोज ५८ रूपये आणि मिळवा तब्बल ८ लाख

बजाज फायनान्स

Bajaj Finance ही कंपनीदेखील सध्या तेजीत आहे. मागच्या आठवड्यात या कंपनीमध्ये ५.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २१ एप्रिल रोजी ५९३७ इतकी शेअर्सची किंमत असून १ आठवड्यात त्याची किंमत साधारण ३४२ रूपयांनी वाढून ६२८० च्या आसपास झाली आहे. 

त्यामुळे सध्या या ३ शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये अधिक तेजीत असल्याचे दिसून येत आहेत. गुंतवणूक करताना नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करा.

आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment